Shubhu1's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 9

अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

Screenshot_20240405-140423.jpg

 

अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर संपूर्ण भारतातील अतिप्राचीन; अतिदुर्मिळ व अतिजागृत मंदिरांपैकी एक आहे.

 

जाणकारांच्या मते संपूर्ण भारतात स्वतंत्रपणे श्री मंगळदेव ग्रहाची मंदिरे अत्यंत दुर्मिळ आहेत.

अमळनेरचे हे श्री मंगळदेव ग्रह मंदिर कोणी बांधले? मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

काहींच्या मते अमळनेरच्या पुरातन श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार १९३३ मध्ये झाला होता.

१९४० नंतर मंदिर पुन्हा दुर्लक्षित व नंतर भग्न झाले. १९९९ पर्यंत मंदिर परिसर नगरपालिकेचा कचरा डेपो झाला होता..., त्यामुळे हे मंदिर गुन्हेगारांच्या लपण्याची आणि गांजा पिणाऱ्यांची जागा म्हणून कुप्रसिद्ध झाले होते..., ही बाब अविश्वसनीय असली, तरी पूर्ण सत्य आहे.

१९९९ नंतर झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे नयनरम्यरीत्या कायापालट झाला आहे.

मागील काही वर्षात तर येथील विविध विकासकामांचा व सोयी सुविधांचा वेग कमालीचा गतिमान झाला आहे.

 

 

  • अमळनेर शहर हे पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी आहे...,म्हणून त्यांच्या स्मृती व कार्याला अभिवादन करण्यासाठी त्यांची प्रतिमा व नाव असलेले प्रवेशद्वार याठिकाणी आहे...👇🏻

 

IMG_20240405_212504-COLLAGE.jpg

 

  • श्री मंगळदेव ग्रहाची धार्मिक माहिती व महती-

 

श्री मंगळदेव ग्रह भूमिपुत्र आहेत. त्यामुळे ज्यांचा उद्योग, व्यवसाय व नोकरी भूमीशी निगडित आहे,

अनेक जण म्हणजेच बिल्डर, डेव्हलपर, शेतकरी, सिव्हिल इंजिनिअर, आर्किटेक्ट आदी श्री मंगळदेव ग्रहाला आराध्य दैवत मानतात.

श्री मंगळदेव ग्रह साक्षात युद्ध देवता आहे. त्यामुळे ज्यांचा व्यवसाय किंवा नोकरी सुरक्षेशी संबंधित आहे,

 

श्री मंगळदेव ग्रह म्हणजे साक्षात धगधगते अग्नितत्त्व आहे.

ते सुबत्ता व समृद्धी देणारे असल्याने त्यांना 'दानी'ही म्हणतात.

IMG_20240405_212827-COLLAGE.jpg

श्री मंगळदेव ग्रहाला ऋणमोचक, शारीरिक पीडानाशक व भयमुक्तीचीही देवता मानतात....,

 

  • श्री मंगळदेवाची मेंढ्यावर बसलेली सुंदर देखणी मूर्ती 👇🏻

Screenshot_20240405-141355.png

 

 

  • विश्वातील एकमेव ठिकाणी असलेली श्री भूमी मातेची मंदिरातील मूर्ती 👇🏻

Screenshot_20240405-141614.png

 

  • पंचमुखी हनुमानाची काळ्या पाषाणातील मूर्ती 👇🏻

 

Screenshot_20240405-141336.jpg

 

  • विश्वातील एकमेव...कमंडलूस्थित श्री अनघालक्ष्मी माता - दत्त भगवान मंदिर👇🏻

 

IMG_20240405_212715-COLLAGE.jpg

तसेच भगवान कालभैरवाचे मंदिर देखील या ठिकाणी आहे., 

मंदिराचे वातावरण सुंदर वाटण्यात भर घालतो तो तुळसाई बगीचा या ठिकाणी आहे...लहान मुलांसाठी भरपूर खेळणे असलेले रोटरी गार्डन आहे.,

 

मंदिराच्या परिसरात खूप मोठा वटवृक्ष आहे त्या खाली स्वामी समर्थांची सुंदर प्रतिमा तेथे बसवलेली आहे 👇🏻

 

IMG_20240405_212912-COLLAGE.jpg

  • अमळनेरला कसे यावे...?

अमळनेरला येण्यासाठी व्हाया धुळे व व्हाया जळगाव असे दोन मार्ग आहेत. जळगावहून अमळनेर ५५ ते ६५ किलोमीटर आहे.

धुळ्याहून अमळनेर ३६ किलोमीटर आहे.

जळगावहून रेल्वे, बस किंवा खासगी वाहनाने येऊ शकता. धुळ्याहून अमळनेरसाठी भरपूर बस व टॅक्सी आहेत.

 

  • मंगळदेव ग्रह मंदिराचा महाप्रसाद-

विशेषण म्हणजे- दर मंगळवारी साधारणतः सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत कांदा व लसूण नसलेली मसाल्याची रस्सेदार मसूरडाळ, कोणतीही मिक्स भाजी, भात, बट्टी व गुळाची जिलेबी असा महाप्रसाद फक्त 54/- रुपयांत मिळतो.

 

या मंदिराला भेट देऊन खूप छान वाटत...पर्यटन आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी या ठिकाणी येऊन आपण अनुभवतो....🤗

 

आणखीन जाणून घेण्यासाठी सोबत Link 🖇️ दिली आहे...👇🏻🤓

 

https://maps.app.goo.gl/FTXAdcYRLNfnHtFdA

 

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

Amalner, Maharashtra, India
24 comments
Level 10

Re: अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

Good post about Amalner Mangaldev Grah Mandir. Never knew there will be any temple dedicated to Mangal Dev (Mars Planet).

 

@Shubhu1 Thanks for sharing with us. 

Level 9

Re: अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

Thank you 🤗 and Welcome 🤗🥰

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

Level 8

Re: अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

@Shubhu1  I am so glad because that historic and beautyful temple had been restored since 1999 and we can see in this post the good results. I wonder if the Lord of war you are talking about  is coincidence with planet Mars ,,,God Mars was the war god for the Romans ,I believe, ad well.

Level 7

Re: अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

I have visited this temple somewhat 6 to 5 years ago because my bhabhi is from amalner that time the construction work was going on  still it was looking nice but after the construction work is done its just looks great. Thanks @Shubhu1 for your post I recalled my all old memories. And many people vist this temple for Mangal Graha puja.

Level 7

Re: अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

Ya planet Mars means Mangal Graha 

Level 10

Re: अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

नमस्कार, 

@Shubhu1 

मस्त माहिती,

सर्व नवीनच आहे माझ्या साठी,

तु म्हणालीस त्या प्रमाणे 

"१९९९ पर्यंत मंदिर परिसर नगरपालिकेचा कचरा डेपो झाला होता, त्यामुळे हे मंदिर गुन्हेगारांच्या लपण्याची आणि गांजा पिणाऱ्यांची जागा म्हणून कुप्रसिद्ध झाले होते,"

हे खुप वाईट होते, पण तु हे हि म्हणालीस कि, "१९९९ नंतर झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे नयनरम्यरीत्या कायापालट झाला आहे.मागील काही वर्षात तर येथील विविध विकासकामांचा व सोयी सुविधांचा वेग कमालीचा गतिमान झाला आहे." हे वाचून खुप समाधान मिळाले..

पोस्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद..

Level 9

Re: अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

Now I'm insist you to visit again this place I'm sure you will be happy....

And Yes you are right many people come here to worship Mangal Graha...Also many celebrities come here... @Ru_pali4

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

Level 8

Re: अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

अमळनेर च्या श्री मंगळदेव ग्रह मंदिराबद्दल फारच छान लिहिले आहेस. मंगळ देवाचे कुठलेही मंदिर माझ्या बघण्यात आले नव्हते. याबद्दल तुझ्या पोस्ट मुळे समजले. सर्व फोटो आणि माहिती दोन्ही उत्तम.

@Shubhu1 

Abhishek Patki
Level 9

Re: अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

Thank you 🤗... मला छान वाटल की तुम्हाला मी लिहलेली post आवडली...👍🏻 तुमच्या बघण्यात नसेल तर एकदा या ठिकाणी भेट द्या 

@abhishekpatk 

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery