mohanghyar's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 8

काकड आरती

काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात.
 
भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते.
 
कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे.
 
दिवाळीच्या दिवसात थंडींत सकाळी लवकर उठून आंघोळ करून कुर्ता पायजमा परिधान करून मंदिरात जाऊन काकड आरती ला सुरुवात करणे म्हणजे एक प्रकारचे धाडसच आहे यामध्ये लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सर्व मंडळी टाळ मृदूंग आणि काकड आरतीचा ठेका धरून हरी नामाचा गजर करतात. 
काकड आरती  (6).jpeg
IMG-20211023-WA0010.jpg
 
गावातील हि आमुची काकड आरती सर्वात मोठी अशी काकडा आरती आहे . याची सुरुवात कर्ता हनुमान मंदिरातून होऊन ती तिची सांगता पण येथे होते . 
काकड आरती  (1).jpeg
 
गल्ली बोळात काकडा वारकरी यांचे पूजन करून त्यांना मानवंदना देण्यात येते .
काकड आरती  (5).jpeg
 
आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात.
काकड आरती  (3).jpeg
 
संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, इत्यादी संतांनी काकड आरती रचल्या आहेत.
 
 
 
Akola, Maharashtra, India
5 comments
Level 10

Re: काकड आरती

नमस्कार,

@mohanghyar 

छान पोस्ट आहे,

लहानपणी आजी काकड्या ने स्टोव्ह पेटवायची, आरती हि करायची, हळूहळू सर्व लुप्त होत गेल, आज तुझी पोस्ट वाचताना काकडा डोळ्यासमोर आला..

पोस्ट बद्दल धन्यवाद..

Level 10

Re: काकड आरती

Lovely post, @mohanghyar 

"Kakad  Aarti" - thanks for sharing this information. 

Well written & narrated through contextual Photos.

 

"On the day of Diwali, getting up early in the morning, taking a bath, wearing traditional dress is prevalent here too"

Best wishes

 

@Shrut19 - How cucumber is used in Aarti? 

Or I am mistaken?

Thanks for your explanation. 

Oh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform me

Level 9

Re: काकड आरती

This is the most humble and mostly holistic style of Arti once I had attended in shirdi ,it happens every day in early morning the first arti for shirdi sai baba in maharastra .

Thanks for sharing @mohanghyar bhau.


Anil Singh

Thanks and Regards


Level 10

Re: काकड आरती

Namaskar..

@TravellerG 

Thank you for your reply Sir..

Some words confusion

Kakada means that perticular Stuff which use to blow Aarti or old carocin stove, old time our grand parents not using matches..

&

Kakadi - cucumber..

I hope I convey both defferent words..

Level 9

Re: काकड आरती

फार छान मित्रा @mohanghyar ! बऱ्याच दिवसाने तुझी पोस्ट पहिली. अतिशय सुंदर मांडणी व फोटो आहेत. मी एकदा माझ्या नशिबाने शिर्डीची काकड आरतीला उपस्थित रहाण्याचा योग्य आला होता , अतिशय प्रसन्न व भारावलेले वातावरण असते. माझी आई सुद्धा आमच्या इथल्या देवळात त्रिपुरी पौर्णिमेला जायची पूर्वी, मी पहाटे पहाटे सोडून यायचो, खूप छान वाटायचे.

ती आठवण परत जागवल्याबद्दल धन्यवाद !🙏

 

 

| Ajit Thite | “Collect moments, not things” – Aarti Khurana |
My Latest posts :- | A Photo Challenge of the Roses: Nature's Masterpieces | Unusual, strange siting challenge: I noticed a plane parked next to the highway! ‌ |