Shubhu1's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 9

Dikshabhumi_Nagpur

 

#1 नागपूर येथील दीक्षाभूमी _ स्तूप#1 नागपूर येथील दीक्षाभूमी _ स्तूप

 

 

गेल्या वर्षी मी आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूरला गेले होते., तशा बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी व घटनांच्या साक्षी असलेल्या या शहरातले मी बघितलेले एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी....
नागपूरला जाऊन तुम्ही दीक्षाभूमी नाही बघितली तर मग काय बघितलं...??
काय आहे बर ही दीक्षाभूमी हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही हे Actually डॉ. आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की.,

मी 'हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' म्हणून अस्पृश्यांच्या उद्धारासाठी आपल्या 6 लाख अनुयायींसोबत त्यांनीबौद्ध धर्म स्वीकारला होता आणि त्यांनी ज्या ठिकाणी हा बौद्ध धर्म स्वीकारला तीच ही दीक्षाभूमी.....,

दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

या ठिकाणी डॉ.आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हटले गेले. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला 'धम्मचक्र स्तूप' असेही म्हटले जाते.


दीक्षाभूमी या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे दीक्षाभूमीची ही इमारत सांचीचे स्तूपापासून प्रेरित होऊन बनवण्यात आलेली आहे.,
स्तूपाचे उजव्या बाजूला येथे बोधी वृक्ष लावण्यात आलेला आहे तो श्रीलंकेतून आणून तेथे लावलेला आहे.


दीक्षाभूमीच्या अंगणात संविधानाची उद्देश पत्रिका लावण्यात आलेली आहे जी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये लावण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बौद्ध धर्म स्वीकारताना घेतलेल्या 22 प्रतिज्ञा याठिकाणी लावलेल्या आहेत.

 

 

 

#2 उद्देशपत्रिका#2 उद्देशपत्रिका

 

 

 

#3  बौध्द धर्म स्विकारताना घेण्यात आलेल्या 22 प्रतिज्ञा#3 बौध्द धर्म स्विकारताना घेण्यात आलेल्या 22 प्रतिज्ञा

 

 

त्याचप्रमाणे दीक्षाभूमीच्या परिसरात त्याचे कार्यालय आणि बौद्ध भिक्खूंसाठी किंवा बौद्ध अनुयायांसाठी राहण्याची ठिकाण देखील याठिकाणी बनविण्यात आलेले आहे.,
दीक्षाभूमीवर सर्वीकडे धम्म ध्वज लावण्यात आलेली आहेत त्यांच्याकडे बघून वाटतं जणू आपल्या स्वागतासाठीच तेथे लावण्यात आले आहेत.,त्या रंगीबिरंगी ध्वजाकडे बघून खूप छान वाटत....

 

 

#4 स्वागतासाठी लावण्यात आलेले धम्म ध्वज#4 स्वागतासाठी लावण्यात आलेले धम्म ध्वज

 


सांची येथील स्तूपाच्या बाहेर जश्या कमान आहेत अगदी तशाच कमान या स्तूपाच्या चारही बाजूंना आहे.,

 

 

#5 स्तुपाची कमान#5 स्तुपाची कमान

 


त्यावर सम्राट अशोकाचे चक्र, हत्ती, घोडे, भिक्खू यांच्या प्रतिमा आहेत त्याचप्रमाणे भारताची राजमुद्रा देखील त्या कमानीवर कोरलेली आहे..,

 

दीक्षाभूमी ची इमारत ही अतिशय भव्य आणि मोठी आहे.,
डॉ आंबेडकरांच्या आयुष्यातील सर्व घटना प्रतिमा स्वरूपात माहिती सकट या ठिकाणी लावलेल्या आहेत.,
आत मध्ये लाकडापासून बनलेले दीक्षाभूमीचे मॉडेल ठेवण्यात आलेले आहे.,
दीक्षाभूमीचे बांधकाम आतून आणि बाहेरून अतिशय सुंदर पद्धतीने केलेले आहे.,
त्याचप्रमाणे डॉ आंबेडकरांची आणि गौतम बुद्धांच्या मूर्ती याठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत.,
तसेच डॉ आंबेडकरांचे अस्ती कलश सुद्धा या ठिकाणी दीक्षाभूमीत ठेवलेले आहे.,

 

 

 

Screenshot_20240406-002624.jpg

 

 


दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात मात्र अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी यांच्या संख्येत लक्षणिय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे आलेले असतात.

भारतातील व विदेशातील, मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट देतात.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.

अतिशय शांततापूर्ण वातावरण असलेल्या ह्या ठिकाणाला भेट देऊन मला खूप छान वाटल आणि एक वेगळीच अनुभूती तेथे जाऊन अनुभवायला मिळाली...,

भारतीय घटनेचे शिल्पकार - डॉ बाबासाहेब आंबेडकरांना उगाच नाही महामानव म्हटलं गेलं ...त्यांनी केलेले कार्य खरचं खुप मोठे होते...भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान म्हंटले जाते ते आंबेडकरांनी लिहले..ते ही इतर देशांच्या संविधानाचा अभ्यास करून...हे सोपे काम नव्हते....
त्यांच्या या अतुलनीय कामाला मानवंदना म्हणून तर ह्या दीक्षाभूमीच्या स्तूपाची निर्मिती झाली... इतिहासाच्या अशा पाऊलखुणा असलेल्या ठिकाणाला भेट देऊन मला नेहमीच चांगले वाटते...

 

 

cle68w.jpg

 

 

 

 

@Rohan10 

@TravellerG 

@Praniketmore 

@ajitthite 

@Tushar_Suradkar 

@NareshDarji 

@HinalLad 

@Shrut19 

@ShubhamWaman 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

Nagpur, Maharashtra, India
14 comments
Level 9

Re: Dikshabhumi_Nagpur

@Shubhu1 

Wow thanks for sharing beautiful post of Dikshabhumi Nagpur about Ambedkar ji beautiful photos. Well said I went for a prayer meeting there also they had kept Ambedkar ji  photo and Buddha ji statue did prayers. 

Level 9

Betreff: Dikshabhumi_Nagpur

@Shubhu1 ein sehr interessanter und informativer Beitrag, mit schönen und dazwischen sehr hübschen Fotos gezeigt 

Level 8

Re: Dikshabhumi_Nagpur

@Shubhu1 खुप छान माहिती मांडली परिपूर्ण छायाचित्रे आणि शब्दांची मांडणी ,

दीक्षाभूमीच सुंदर वर्णन केलंस स्तूपची कमान आणि ध्वजाचे छायाचित्रे यांची मांडणी उत्तम केलीस.

 

Praniket More || " Having a hobby is sweet for your psychological state – Chanakya " ||

My Insta||My Post Gallery|| Hex sticker design competition winner

Level 8

Re: Dikshabhumi_Nagpur

@Shubhu1 अप्रतिम लेखन आणि मांडणी. दीक्षाभूमी माझे आवडते स्थळ आहे. दरवर्षी माझी एक भेट असतेच. तिथले वातावरण खूप छान आहे आणि ती एक वेगळीच अनुभूती देत असते. बुद्धांची मूर्ती खूप सुंदर आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंती निमित्त ही पोस्ट शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद... 

Photographer & Trekker
#LocalGuideOfIndia

My Insta
My WhatsApp Channel
Level 9

Re: Dikshabhumi_Nagpur

Very good post shubh 🙏🙏

You are doing amazing work 🙏🤝 keep sharing. 

Satyameva Jayate सत्यमेव जयते
Connect Moderator

Re: Dikshabhumi_Nagpur

Excellent post @Shubhu1 with wonderful photos 👍

Yes, I remember @Rohan10 too had written an amazing post about DikshaBhumi in Nagpur.

This gives me more compelling reasons to visit Nagpur soon 😊

Level 9

Re: Dikshabhumi_Nagpur

खूप छान पोस्ट, @Shubhu1. सर्व फोटो अप्रतिम. मला काही वर्षांपूर्वी @Rohan10 ने लिहिलेली पोस्ट आठवली. 

एका महान मानवाला माझ्यातर्फे अभिवादन. 🙏

 

धन्यवाद!

 

| Ajit Thite | “Collect moments, not things” – Aarti Khurana |
My Latest posts :- | Great Place to pause for Some Moments to Live: Ka'Soul Cafe, Pune |
Connect Moderator

Re: Dikshabhumi_Nagpur

तुम्ही दीक्षाभूमी नागपूर बद्दल खूप छान पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये तुम्ही असे छान फोटो टाकले आहेत. त्यांना शेअर केल्याबद्दल धन्यवाद. @Shubhu1 

About me | Guiding Star 2020 | Guiding Star 2020 |  | Follow me on Instagram & Follow me on Maps |   | Happy to Help


Please use '@' before the name to tag me.



Level 8

Re: Dikshabhumi_Nagpur

खूप छान पोस्ट @Shubhu1 .

अतिशय सुंदर फोटोज् आणि लेखन पण मस्त आहे.

पोस्ट शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏🏻.

Shubham Waman || "Every click tells a Story" ||


 My Profile Follow me on Maps Instagram