ShubhamWaman's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 8

कास पठार : नैसर्गिक फुलांचे ठिकाण

कास पठार 

 

कास पठार  हे एक अत्यंत लोकप्रिय असे पर्यटन स्थळ आहे.

छान वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुले या ठिकाणी उगतात. ती काही मर्यादित कालावधी पर्यंतच असतात. पण जेव्हा ही फुले या ठिकाणी फुललेली असतात काय नजरा असतो पाहण्यासारखा.

जर तुम्हाला वनस्पति शास्त्रात रस असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक वरदानच असणार आहे.

या ठिकाणी फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्येच फुले येतात.

या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते.

येताना लवकर निघावे म्हणजे वेळेत परत जाता येते.

 

#1 View of Kaas Pathar#1 View of Kaas Pathar

 

खुप दिवांपासुन महाबळेश्वर आणि पाचगणी ला जायचं विचार चालू होता. 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टबर हा ३ दिवसाचा वेळ आहे हे लक्षात ठेवून भावाने योजना आखली आणि म त्यांची अंमलबजावणी केली.

ठरलेल्या वेळेनुसार मग मुंबई वरतून खाजगी वाहनातून प्रवास सुरू केला. पहिले दोन दिवस महाबळेश्वर मध्ये घालवल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून सरळ कास पठार कडे रवाना झालो.

 

#2 Collage of Flowers 1#2 Collage of Flowers 1

 

पहिल्या वाहनतळावर पोहोचलोच होतो तर तिथे उभे असणाऱ्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्याने विचारले तुमची ऑनलाईन बुकींग आहे का ?

असेल तरच तुम्ही गाडी लावून आत जाऊ शकता.

आम्ही गोंधळून गेलो एव्हढ्या लांबून आलो आणि आता हे जाऊन नाही देणार.  मग आम्ही  बोललो रस्त्यावरून का होईना पण आपण बघून जाऊ.

आम्ही गाडी वरच्या दिशेने घेऊन गेलो. थोडेच पुढे गेलो आणि प्रवेशद्वार आले. तिथे बघितले तर प्रचंड गर्दी होती.

गाडी उभी पण करून देत नव्हते, भावाने आम्हाला उतरायला सांगितले आणि बोलला , तुम्ही ऑफलाईन मध्ये तिकीट भेटत आहे का नाही ते पाहा, मी गाडी लावून येतो.

#3 Collage of Flowers 2#3 Collage of Flowers 2

 

इकडे आम्ही चौकशी करत होतो. ऑफलाईन तिकीट साठी बोलणी केली पण व्यवस्थापकीय कर्मचाऱ्याने सरळ नाही म्हणून सांगितले.

मग आम्ही खूप निराश झालो. भावाला कॉल करून परत बोलावण्याचा प्रयत्न करत होतो.

 पण नेटवर्कची खुप समस्या होती. फोन ही लागत नव्हता.

आणि तेवढ्यात कसे  काय माहित वॉकी टॉकी वर ऑफलाईन बुकींग घेण्याचा संदेश व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना आला आणि हे ऐकताच मी लगेच जाऊन आमचे तिकीट काढून घेतले.

आता तिकीट भेटले होते पण भाऊ गाडी पार्क करून यायला खुप वेळ लागला होता तर आम्ही चिंतेत होतो नक्की काय झालं असेल. आम्ही भेटलेले तिकीट कोणाला तरी देण्याच्या तयारीत होतो कारण भावा सोबत काही संपर्क होत नव्हता, तेव्हड्यात वहिनीला भाऊ मिनी बस मध्ये येताना दिसला.

आणि आमच्या जीवात जीव आला. मग आम्ही आत गेलो.

 

#4 Collage of Flowers 3#4 Collage of Flowers 3

 

आत गेल्यावर मग निवांत झालो. काय तो नजारा आहाहा... एकदम कडकचं ! विविध रंगांची फुले बहरलेली होती. अतिशय सुंदर दिसत होते. मग आम्ही फोटो काढण्यास सुरूवात केली मग २ -३ तास वेळ आम्हाला आत मध्ये फिरण्यामध्येच गेला. खूप सुंदर असे वातावरण असते. तिथे मध्येच पाऊस यायला लागला होता मग काय त्यात ओले चिंब भिजलो. वातावरणाचा आनंद घेतला. मग बाहेर येवून मिनी बस ने वाहन तळाकडे रवाना झालो.
आम्ही काही खायला काही घेऊन गेलो नव्हतो.
खूप भूक लागली होती त्यात पाऊस पडला होता आणि आम्हाला कांदा भजी दिसली. वातावरण तर झालेच होते अन् त्यात कांदा भजी मग खाण्याचा मोह काही आवराला नाही.
खाऊन झाल्यावर मग तिथून सरळ परतीचा प्रवासाला सुरुवात केली. आणि रात्री उशिराने ने घरी पोहोचलो व जाता जाता पुढच्या प्रवासाची तयारी करत गेलो 😄.

 

#5 Table Land View of Kass#5 Table Land View of Kass

जाताना घेण्याची काळजी ?

  • छत्री किंवा रेनकोट सोबत घेऊन जावा. पावसाचा काही भरोसा नसतो.
  • खाण्यासाठी काहीतरी आणि पाणी बॉटल सोबत असावी.
  • शक्यतो ऑनलाईन बुकींग करूनच जावे.

 

गाडी 🚘 कुठे लावू ?

  अजिबात काळजी करू नका. गाडी लावण्यासाठी प्रशस्त असे वाहनतळ उपलब्ध आहे. तुम्ही तिथे तुमची गाडी लावू शकता तेही मोफत.

 

तिकीट 🎟️ किती आहे ?? 

  जास्त नाहीये रे फक्त १५० प्रती व्यक्ती

 

 खायचे काय 😬??

 माझ्या मते तरी आपले जेवण आपण सोबत घेऊन जावे. वाहानतळाच्या बाजूला छोटे स्टॉल आहेत पण तिथे पण खाऊ शकता. 

आजूबाजूला काही फिरण्यासारखे आहे का ?

 

 

Shubham Waman  || "Every click tells a Story" ||
My Posts || Map Profile
Mahabaleshwar, Maharashtra, India
36 comments
Connect Moderator

Re: कास पठार : नैसर्गिक फुलांचे ठिकाण

कासच्या अप्रतिम पठाराचे दर्शन घडवल्या बद्दल अनेक आभार @ShubhamWaman 
सर्व फोटो आणि कोलाज व त्यातील फुले सुरेखरित्या मांडले आहेत 👍

Level 8

Re: कास पठार : नैसर्गिक फुलांचे ठिकाण

या ठिकाणी जाण्याचा योग अजुन आला नाहिये. खूप इच्छा आहे. तू कास पठाराचे दर्शन घडवले त्याबद्दल धन्यवाद @ShubhamWaman 

Abhishek Patki
Level 8

Re: कास पठार : नैसर्गिक फुलांचे ठिकाण

@ShubhamWaman खुप छान पोस्ट सुंदर महिती दिलीस आणि फुलांचे फोटो खुप छानरित्या काढले आहेस,

अशा अप्रतिम ठिकाणी नक्कीच मी जाईन.

Praniket More || " Having a hobby is sweet for your psychological state – Chanakya " ||

My Map||My Insta||My Post Gallery

Level 8

Re: कास पठार : नैसर्गिक फुलांचे ठिकाण

@ShubhamWaman 

कास पठार
सुंदर शुभम अति सुंदर लय भारी

Level 6

Re: कास पठार : नैसर्गिक फुलांचे ठिकाण

@ShubhamWaman  कास पठार हे महाराष्ट्राचे प्राकृतिक वैभव आहे. सदर माहिती खूप उत्तम प्रकारे मांडली आहे. कोलाज आहे photos उत्तम आहेत.

Level 10

Re: कास पठार : नैसर्गिक फुलांचे ठिकाण

नमस्कार,

@ShubhamWaman 

खूप छान.. अनुभव लेखाची मांडणी, अगदी समोर बसून ऐकल्याचा व पठार फिरून आल्याचा भास, 

छान पोस्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद..

 

 

Level 9

Betreff: कास पठार : नैसर्गिक फुलांचे ठिकाण

@ShubhamWaman 

Eine gute Geschichte und das Plateau samt den sehenswerten Blumen wunderschön.

Level 8

Re: कास पठार : नैसर्गिक फुलांचे ठिकाण

खूप खूप धन्यवाद @Tushar_Suradkar दादा.

Shubham Waman  || "Every click tells a Story" ||
My Posts || Map Profile
Level 8

Re: कास पठार : नैसर्गिक फुलांचे ठिकाण

खूप खूप धन्यवाद @abhishekpatk .

एकदा नक्कीच भेट द्या. खूप भारी जागा आहे.

Shubham Waman  || "Every click tells a Story" ||
My Posts || Map Profile